नागरीकानचे आरोग्य धोक्यात..! कन्हान नप अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या साफ-सफाई करूण ब्लिचींयुक्त स्वच्छ पिण्याचे पाणि पुरवठा करावे. सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व नांगरीकांची मागणी
कन्हान:- कन्हान नगर-परीषद नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना शहरवासी सामाजिक कार्यकर्ता श्री प्रशांत मसार व नांगरीकाची लेखी व तोंडी मागणी करण्यातआली. कन्हान शहरा अंतर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या मागील कित्येक वर्षापासन साफ-सफाई करण्यात आल्या नाही तसेच ह्यामधे ब्लिचीग ही टाकण्यात येत नाही.
ही बाब नांगरीकाचा आरोग्यबाबद जिवघेणा धोका निर्माण होऊ शकतो असे लक्षात येत असून कन्हान शहरातील नांगरीकांनी नगरपरीषद कार्यालय येथे जावुन नगरपरीषद नगराध्यक्ष सौ.करूणा आष्टणकर व मुख्यधिकारी श्री. गिरीश बन्नोरे यांना लेखी निवेदन व तोंडी सांगण्यात आले.
की ह्या ज्वलंत जिवघेणा समस्येचे गांभीर्याने घ्यावे यांवर उपाययोजना म्हणुन शहराअंतर्गत येणाऱ्या सर्व पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या साफसफाई करूण व नियमीतपणे ब्लिचींयुक्त पिण्याचे पाणी टाक्याद्वारे स्वच्छ,फायदेशीर आरोग्यदायक पुरवठा करण्यात यावे. सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार तसेच मिलींद मेश्राम,वृषभ बावनकर, राजेश गजभिए, अशोक नारनवरे, दिपक कुंभारे, नरेंन्द्र सोनेकर, विपीन गोंडाणे,भोला भोयर, कुंदन रामगुंडे,दिपक तिवाडे,अरविंद चांदुरकर, महेंन्द्र वानखेडे, चंदन मेश्राम, विनोद येलमुले, रमेश ठाकरे, क्रिष्णा गांवडे ,पंकज गजभिये ,सोनु मसराम आदि नांगरीकांनी मागणी केली.


0 टिप्पण्या