Advertisement

पारशिवनी मध्ये मोदी सरकार(भाजप पक्ष) च्या महांगाई विरोधात काँग्रेस चे तीव्र निदर्शने

पारशिवनी मध्ये मोदी सरकार(भाजप पक्ष) च्या महांगाई विरोधात काँग्रेस चे तीव्र निदर्शने

करंभाड/(पारशिवनी):- वाढते पेट्रोल, डिझेल आणि जीवन आवश्यकव तसेच जीवनाशी निगडित वस्तूंचे प्रचंड भाववाढीचे विरोधात हर्षवर्धन निकोसे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांसह

करंभाड पेट्रोल पंपावर तीव्र निदर्शने करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही काळ पारशिवानी ते सावनेर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे काही काळ रस्ता वाहतूक विस्कळित झालेली होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी व जिल्हा काँग्रेस चे महासचिव गज्जु यादव यांच्या सूचनेनुसार मोदी सरकार च्या तसेच दरवाढीच्या विरोधातिल, आंदोलनात प्रामुख्याने उमराव बंटी निंबोने, नीकेश भोयर,अमजद पठाण, प्रमोद काकडे, वाहिद शेख, जालीम शेख, निलेश भगडकर, कुणाल थोटे, कुणाल केचे, दिवाकर काळे, कृष्णा रांगणकर, कुंदन हिवरकर, राकेश महल्ले, रोशन थोटे, अरविंद देशभ्रतार, प्रमोद गजभिये, उमेश घेर, धनराज तायवाडे, गुंडेराव चव्हाण, प्रशांत लकडकर, मंगेश मुलरवार, आकाश नेवारे, चेतन खोरगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी:- प्रा.नीता इटनकर,पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या