रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री कृपालजी तुमाने यांच्या वाढदिवस निमित्य कोरोना रुग्णांना आवश्यक वस्तू कीट वाटप
पारशिवनी:- रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. कृपालजी तुमाने साहेब यांच्या वाढदिवस निमित्य मंगळवार दि.०१/०६/२०२१ ला पारशिवनी येथील कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना रुग्णाना फळे, ओआरएस, ग्लूकोज,बिस्किट , मास्क किट वाटप करण्यात आले. पारशिवनी कोविड केअर सेंटर येथील १५ रुग्नाना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. त्यांत काही स्त्री पुरुष व लहान मुले, बाळ देखील रुग्ण होते. अश्या नाजूक परिस्तिथी मध्ये शिवसेना पदाधिकारी श्री वर्धराज पिल्ले यांनी रुग्णांना मानसिक सांत्वना देऊन व त्यांची इच्छा शक्ती प्रबळ करून होसला वाढवले. श्री.वर्धराज पिल्ले यांनी रुग्णांशी चर्चा केली व सुविधे विषयी विचारणा देखील केली. जर खुठ्ल्याही प्रकारे कोविड केअर सेंटर मध्ये अडचण असेल तर आम्हाला सांगा त्यांचा नक्कीच उपाय काढू असे देखील सांगितले.
तसेच कोविड सेंटर वर सेवा देणारे डॉक्टर, नर्स ,वार्ड बॉय , पोलीस स्टॉफ,सफाई कामगार यांना सेनिटायझर,मास्क, बिस्किट ,ग्लूकोज कीट चे वाटप देखील करण्यात आले.

तसेच संपूर्ण पारशिवनी पोलीस स्टेशन चे कमर्चारी यांच्या करिता सेनिटायझर व बिस्किट बॉक्स देण्यात आले…या प्रसंगी नागपुर उपजिल्हा प्रमुख श्री.वर्धराज पिल्ले, गौरव पनवेलकर, निक्कूजी पिल्ले, शारुख खान,गोलू पिल्ले, सौ. सुभांगी घोगले, सौ. कुंदा ताई , सौ.मनीषा चिखले ह्यावेळी प्रामुख्यानी उपस्तिथ होते…..



0 टिप्पण्या