कन्हान नगर परिषद अंतर्गत होणाऱ्या विकास कामाची आढावा बैठक, आमदार श्री आशिष जैस्वाल यांच्या अध्यक्षतेत संपन्न…
कन्हान/पारशिवनी दि.१३:- कन्हान नगर परिषद अंतर्गत होणाऱ्या विकास काम अंतर्गत आढावा बैठक आमदार श्री आशिष जैस्वाल व नगर अध्यक्षा सौ.करुणा आष्टनकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न… कन्हान-पिपरी नगर परिषद मध्ये विविध विषयावर आढावा बैठक विविध विषयावर चर्चा खालील प्रमाणे:-
- नवीन पाण्याच्या जैकवेल संदर्भात चर्चा… आढावा घेण्यात आला संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून संदर्भीय अडचणीवर मात कशी करता येणार.. ह्या संदर्भात नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश.. कन्हान शहर हे मोठी लोकसंख्या असलेले ठिकाण असून पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही संपली नाही त्यावत मोठी उपाययोजना आखंन्याया कारिता आदेश देण्य्यात आले जेणे करून कन्हान शहर मधील पाण्याची समस्या कायमची संपुष्टात येईल.
- शिहोर पांधन रस्त्याचे संदर्भात चर्चा:- संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून शिहोर पांधन रस्त्याचे आता पर्यंत काम का सुरु झाले नाही….लवकरात लावक पंधान रस्त्याच्या कामाला सुरुवात करून संबंधित अडचणी आपल्या स्तरावर सौल करण्याचे निर्देश देण्यात आले.. येत्या काही दिवसात उद्योग धंद्यासाठी शिहोर पंधान रस्त्याची भूमिका मोलाची असून आतापर्यत शिहोर पंधान रस्त्याचा विषय मोकळा का झाला नाही जाब विचारणा करून सक्तीने कार्य पार पाडण्याचे आदेश देण्यात आले. शासकीय विकास कार्यात कोणी विनाकारण अडथळे निर्माण करीत असेल त्यावर शासकीय कार्यवाही करा. असे आदेश सुद्धा देण्यात आले.
- WCL च्या मातीच्या डम्प मुळे जवळपास च्या नगराला डस्ट मुळे स्वास घेण्यासा त्रास…च्या विषयावर चर्चा:- WCL च्या ब्लास्टिंग व खोदकाम व वेस्ट माती मोठ्याप्रमात डम्प करीत असल्या मुळे जवळपास च्या परिसरात मोठ्या प्रमाण धुळीने लोकांच्या प्रकुर्तीवर दूष परिणाम होत असल्यास संबंधित अधिकारी यांना विचारणा करून याचा जाब विचारण्यात आला. WCL (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) च्या जवळ पास कन्हान शहर चा 40% परिसर जूळलेला आहे… त्या हे नगर आहेत…संपूर्ण पिपरी, धरम नगर, अशोक नगर , सुरेश नगर, रायनगर इत्यादी नगराला सीमा WCL ची सीमा लागलेली आहे. wcl डम्प करतेवेळी साधारण जनतेचा विचार न करता मोठ्या प्रमाण उत्खनन मधील मातीचे डम्प करून …. धूर, डस्ट उत्सर्जन करून जवळपासच्या गावकरी जनतेची प्रकृती खालावान्यासा कारणीभूत ठरत आहे. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वास घेण्यात त्रास होणे म्हणजे… आरोग्याशी खेळ होत आहे हे सिद्ध होत आहे. ह्या संदर्भात आमदार आशिष जैस्वाल यांनी संबंधित अधिकारी याच्यावर त्वरित कार्यवाही करून उपाय काढण्यासा सांगितले.
- कन्हान-पिपरी नगर परिषद च्या नवीन कार्यालय इमारतीवर सोलर सिस्टम लावण्या करिता चर्चा करून सोलर उर्जा चे महत्व समजाऊन भविष्यात मोठ्या प्रमाणात उर्जेचा साधन होऊ शकतो…
- राय नगर(कन्हान) प्र.क्र.५मधील समाज भवन संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा:- 2018 पासून रखडत असलेल्या समाज भवन विषयी उत्कृष्ट काम करण्य्यात यावा ह्या विषयी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून मोका चौकशीन करून, समाज भवन संदर्भात आढळलेल्या त्रुट्या भरून काढणे व काम उत्कृष्ट दर्ज्याचे करण्यात यावे असे आदेश आमदार आशिष जयस्वाल याच्या तर्फे देण्य्यात आले.
- covide19 च्या काळात तयार करण्यात आलेले रेशन पत्रिका वर धान्य मिळत नसल्यास चर्चा:- संबंधित अधिकारी याना विचारणा करून संबंधित व्यक्तींचे राशन कार्ड तयार होऊन जवळपास वर्ष होत आला तरी सुद्धा त्यांना राशन का मिळत नाही ह्यावर लवकरात लवकर उपाय-योजना करून गरीब जनतेला लवकरात लवकर रेशन देण्यात यावा असे आदेश देण्यात आले. ज्यांना रेशन ची गरज नाही किव्वा जे रेशन उचलत नाही अस्यांचे रेशन गरीब व गरजू जनतेला ट्रान्स्फर करण्यात यावे. आमदार यांच्या कडून सुचविण्यात आलेल्या मार्गदर्शन च्या हिशेबनी कार्य करण्यास प्रेरित केले.
- कन्हान शहर मधील मटन व चिकन च्या मार्केट करिता चर्चा:- कन्हान शहर मध्ये अद्यापही मटन मार्केट करीता मालकी हक्काची जागा नाही त्याकरिता.. त्यांना नवीन महामार्ग च्या कडेला खाली जागेची मागणी करणयात आली. चिकन मार्केट चा वेस्ट हा सिधा नदी मध्ये प्रवाहित होतो त्यावर काय उपाय योजना यावर देखील चर्चा करण्यात आली… चिकन/ मटन मार्केट च्या दुकान दार ला आदेश देण्यास सांगितले कि त्यांचा दिस्पोसल प्लांट निर्माण करा वेस्ट नदीत जाता कामा नये. चिकन मार्केट करीता नवीन इमारत उभारणार, ह्यावर चर्चा देखील करण्यात आली. संबंधित चिकन मार्केट करीता नवीन इमारत उभारण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे आदेश देखील देण्यात आले.
- कन्हान-पिपरी नगर परिषद डी.पी.प्लान २०१९ मध्ये नगर रचना,नागपूर कडे गेला असून, आता पर्यत नगर परिषद कन्हान ला डी.पी. प्लान मीळालेला नाही. ह्या संबंधित अधिकारी सोबत विषयावर चर्चा करण्यात आली.
- कन्हान नदीच्या काठी असलेले प्राचीन हनुमान मंदिर, रेल्वेच्या तिसरी लाईन द्वारे तोडण्यात आल्यानी नवीन जागेवर मंदिर तयार करून हनुमान मूर्ती स्थापन करून देण्या करीता संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून, लवकरात लवकर मंदिराचे काम पार पाडण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली.
- “नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत” २०१७- २०१८ व २०१८-२०१९ च्या निधी अंतर्गत प्रभाग क्र. ०२,०३, तसेच ०४ मध्ये सत्रापूर इथे कामे पूर्ण झालेली नाही. व खूप दिवसापासून कामे रखडली जात आहे. दलित वस्ती च्या विकास कामात लवकरात लवकर गती प्रदान करण्या करिता संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
ह्या वेळेस प्रामुख्यांनी उपस्थीत.आमदार श्री.आशिष जयस्वाल (रामटेक विधानसभा ५९ )
तहसीलदार(पारशिवनी) श्री.वरूनकुमार सहारे
उपजिल्हा प्रमुख (नागपूर-ग्रामीण,शिवसेना):- श्री.वर्धराज पिल्ले
नगरअध्यक्ष(कन्हान नप ):- सौ.करुणा अष्टनकर
उपाध्यक्ष (कन्हान नप):- श्री.डायणल शेंडे
माझी कन्हान नप अध्यक्ष:- श्री.शंकर चहांदे
नगर सेवक(कन्हान नप) :- अनिल ठाकरे,सौ. मोनिका पौनीकर, राजेश यादव,राजेंद्र शेंद्रे, योगेंद्र रंगारी, पुष्पा कवळकर,रेखा टोहने, विनय यादव, कल्पना नितनवरे,संगीता खोब्रागडे, संबंधित विषयावर चर्चा करीता अधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्तीत होते.


0 टिप्पण्या