Advertisement

मनपा निवडणुकीसाठी राखीव उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य

मनपा निवडणुकीसाठी राखीव उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य

नागपूर, ता. १०: राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या १८ मार्च २०२० च्या पत्रान्वये नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकरिता राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

मनपा निवडणुकीचे अनुषंगाने राखीव जागेवरुन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांने नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे पत्रामध्ये नमुद केले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या भविष्यात होवू घातलेल्या निवडणूकांचे अनुषंगाने  राखीव जागांवरुन निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळीच जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या