Advertisement

ऑनलाईन शिक्षणासाठी संबंधित शिक्षकांना शक्यतो शाळेत न बोलाविण्याबाबत:शिक्षण अधिकारी प्रीती मिश्रीकोटकर याचे माहिती पत्रक जारी

शिक्षण अधिकारी प्रीती मिश्रीकोटकर याचे माहिती पत्रक जारी

ऑनलाईन शिक्षणासाठी संबंधित शिक्षकांना शक्यतो शाळेत न बोलाविण्याबाबत                                          संदर्भ १) मा.आयुक्त यांचे आदेश क्र.१४२/२०२१ , दि. ११/०३/२०२१

नागपूर:- नागपूर शहर सीमेत दि.१५ मार्च२०२१ ते २१ मार्च२०२१ पर्यंत नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग,प्रशिक्षण संस्था ,व इतर तत्सम संस्था सुरु ठेवण्यासा प्रतिबंध करण्यात आले आहे.तथापि, शाळा व संस्थाद्वारे ऑनलाइन स्वरुपात कामकाज सुरु ठेवता येईल.

शाळेतील ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवण्यासाठी सर्व शासकीय तसेच निमशासकीय/खाजगी शाळेतील ( सर्व व्यावास्थापांच्या शाळेतील ) शिक्षकांना शक्य तो शाळेत न बोलावता घरूनच ऑनलाइन स्वरूपातील काम करण्याबाबत कळवावे.

सदर बाब शक्य नसल्यास, शिक्षकांना शाळेत बोलविणे आवश्यक असल्यास जास्तीत जास्त एकूण क्षमतेच्या २५ टक्के शिक्षक व कर्मचार्यांना उपस्तीथ ठेवता येईल.तथापि त्याबाबत संबंधित शिक्षकांना आवश्यक पत्र/आदेश देण्यात यावे. जेणेकरून याबाबतची सत्यात पडताळणी करणे यंत्रणेस सोयीचे होईल.

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत धान्यादि साहित्य शाळेत उतरवून घेणे संबंधात सुद्धा आवश्यक शिक्षक/कर्मचारी यांना पत्र /आदेश देऊन संबंधित दिवशी शाळेत हजर ठेवावे.                                                  मा.आयुक्त यांचे निर्देशान्वये

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या