Advertisement

स्त्री शक्ती जागृती महिला मंडळ,पारशिवनी-रामटेक च्या वतीने! जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला

स्त्री शक्ती जागृती महिला मंडळ,पारशिवनी-रामटेक च्या वतीने! जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला

स्त्री शक्ती जागृती महिला मंडळ,  पारशिवनी- रामटेक तालुक्यात च्या वतीने जागतिक महिला दिना निमित्य महिलांना सुरक्षा व कायदे विषयक सल्ला मार्गदर्शन सभा कार्यक्रम पोलीस स्टेशन पारशिवनी येथे अयोगीत करण्यता आले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांच्या कर्यचिओ ओळख करून महिला सभा मार्गदर्शनाची सुरुवात करण्यात आली’कार्यक्रमाच्या अध्यक्षा महिला मार्गदर्शक मा.नयन आलुकर उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांनी महिलांना गृहिणीचे महत्व सांगून त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच निर्भीडपणे अन्यायाला समोर जाण्याचे आव्हाहन केले.

सुरक्षा कायदा व पोक्सो केसेस विशाखा सांगीति द्वारे अश्लील विरोधी कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. विशेष मार्गदर्शक पारशिवनी पोलीस निक्षक विशेष वैरागडे यांनी महिलांना नवीन कायदे शक्ती कायदा एसिड हल्ला गुन्हा,कैटूमभिक व घटस्पोट पिडीताला कायद्याची जाणीव करून देऊन समुपदेशन करण्यात आले. नगर पंचायात पारशिवनी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या

प्रमुख अतिथी:- वैशाली वैरागडे (नागपूर महामार्ग पोलीस निरीक्षक ) यांनी कैटूमबिक त्रासत व शोषित महिलांना जागृत केले.महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा.निता इटनकर यांनी महिला समानता व महिला सशक्तीकरण तसेच भारतीय संविधानातील महिलांचे अधिकार या विषयी मार्गदर्शन केले.

अंगणवाडी पर्यवेक्षिका तारा वूरडे यांनी मुलीचे जन्मापासून स्वागत करावे, “बेटी बचाव”  मार्गदर्शन केले. या प्रसंगी महिला मंडळ तर्फे ग्रामीण भागातील चंद्रकला वरठी महिलेने हलाकीच्या परिस्तिथीत मुलींना घडविण्याचे उदाहरण देत, राज्य स्तरीय धावपटू आचल वरठी यांना सन्मान पत्र व मेडल देऊन आई व मुलीचा सत्कार करण्यात आला,तसेच सामाजिक आरोग्य,कला,योगा,गृहिणी,व्यवसायिका,अंगणवाडी सेविका, महिला पोलीस कर्मचारी इ,क्षेत्रात काम करणाऱ्या, महिलांना मंडळातर्फे “कर्तुत्ववान महिला सन्मानपत्र व मेडल देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुषमा कामडे यांनी केले                                                                    स्वागत:- गीता ढोबळे,कविता डोनारकर, ज्योती इटनकर, निता गोमकाळे, रंजना कोल्हे,सविता वाघाडे,शिल्पा बडवाईक, अर्चना वाघमारे यांनी केले,                                                                                                 आभार प्रदर्शन सौ.रीना नंदेश्वर, यांनी मानले मंडळाच्या वतीने सर्व महिलांना “जागतिक महिला दिनाच्या” हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिनिधी:- प्रा.निता इटनकर,पारशिवनी(नागपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या