घरगुती विज बिल न भरल्याने महावितरण कंपनी द्वारे विज कापणी (तोडणी) करीत असून ह्यावर सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी
विनंती,मागणी युवा सामाजिक कार्येकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांच्याद्वारे करण्यात आली
महावितरण कार्यालयात भेट देत मा.उपविभागीय अभियंता व मा.कनिष्ठ अभियंता यांच्याशी चर्चा करुण निवेदन देण्यात आले
कन्हान- नागपूर जिल्हामधे कोरोणा कोव्हीड19 संसर्गजन्य रोगराईचा तीव्र गतीने फैलाव सुरू आहे अशातच राज्य सरकारकडुन मागील वर्षापासन ते आजपर्यंत ह्यावर ताळेबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन ह्या सारखा उपाययोजना राबवुन रोगराई थांबविण्याचा प्रयन्त सुरू आहे.
शहरात नांगरीक कुंटूबांचे उपजिवीका, उदरनिर्वाह चालविण्याकरीता संसाधन सर्वत्र कमी झाले असून नांगरीगण कुंटूबिय आर्थिक, माणसीक, शाररीक दृष्ट्या त्रस्त आहे अशातच कन्हान शहरामधे महावितरण कंपनीने घरगुती विज कापणी अभियान सुरू केले असून ह्यामधे काही नागरी कुटूंबियांची परीस्थीती लॉकडाऊनमुळे अत्यंत बिकट,हालाखाची झाली.
घरगुती वीज बिल देयके भरणे शक्य झाले नाही ह्या सबंधीत विषयाचे गांभीर्याने घेवुन युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात एक शिष्ठमंडळ कन्हान येथील महावितरण कार्यलय येथे जावुन विभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची भेट घेत वरील विषयाबद्दल चर्चा करीत सांगितले की, ज्या नागरी कंटूबियांनी घरगुती विज बिल देयके न भरल्याने त्यांना थोडाफार वेळ, सवलत द्यावे
तसेच विज कापणी अभियान थांबवुन द्यावे अशी विनंती आशयाचे लेखी पत्र देण्यात आले तसेच जि.प. अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांना ही अवगत केले ह्यावेळे प्रशांत बाजीराव मसार, नितीण मेश्राम,पकंज गजभिए , सुरेश वाघमारे, अमोल साकोरे,मोरेश्वर भोयर, चंदन मेश्राम, अविनाश हातागडे,गणेश भालेकर, शुभम मांदुरकर आदी नांगरीक उपस्थीत होते.


0 टिप्पण्या