ऍड.मार्डिकर यांच्या फार्म हाउस संवधनी ता.रामटेक येथे ब्राउन रंगाचा साप (कोबरा साप) लांबी:-५ फुट लांबिचा आढळला. हा साप सायंकाळी ४:०० वाजताच्या सुमारास दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्प मित्र अभय विटीवाले यांना सांगण्यात आले व घटना स्थानाची पाहणी करता त्यांना ब्राउन रंगाचा साप आढळला.त्यांनी जवळपासच्या लोकांना त्या साप विषयी माहिती दिली व हा दुर्मिळ साप आहे.हे साप खूप कमी दिसतात. हे साप सहसा जंगली व डोंगराळ भागात जास्त वेळ राहणे पसंत करतात.
स्थानिक लोकांनी व शेतकऱ्यांनी सापांविषयी माहित असणे खूप आवश्यक आहे. सापाची प्रजाती कळत न कळत पृथ्वी तळावरून स्वपवंन्या साठी मनुष्य कुठे तरी कारणीभूत आहोत,असे समजावून सांगितले.
सर्प मित्र अभय विटीवाले व प्रवीण धुर्वे यांना प्रीतम वहाने यांनी फोन द्वारे सांगण्यात आले होते.
घटना स्थानी सर्प मित्र अभय विटीवाले व प्रवीण धुर्वे पोहचून भारतामधील दुर्मिळ साप ब्रॉव्हन कोब्रा सापाचे जीव वाचविण्यात यश मिळाले.सर्प मित्र अभय विटीवाले व प्रवीण धुर्वे यांनी साप पकडून जंगल मध्ये सोडुन दिले.
प्रतिनिधी:- विकी धुर्वे मनसर(नागपूर)



0 टिप्पण्या