Advertisement

कन्हान मध्ये ठिकठिकाणी पोलिओ मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.

“दोन थेंब पोलिओ चे आयुष्य लाभेल मोलाचे”

कन्हान मध्ये ठिकठिकाणी पोलिओ मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.

0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस न चुकता दिनांक ३१/०१/२०२१ रोज रविवार ला

आपल्या जवळच्या बुथवर अंगणवाडी, शाळा  बस स्टँड ,रेल्वे स्टेशन ,टोलनाके, सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजण्यात आले.

बाळ नुकतेच जन्मलेले असेल तरीही डोस पाजण्यात आले .या पूर्वी डोस दिला असेल तरीही डोस पाजण्यात आले.

बाळ आजारी असेल तरीही( वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने)

“दोन थेंब पोलिओ चे आयुष्य लाभेल मोलाचे” अश्या प्रकारे पोलिओ डोस पाजण्यात आले.

वेळ:सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत. हि राष्टीय स्तरावर पोलिओ मुक्त भारत अभियान रविवार दिनांक ३१/०१/२०२१ ला राबविण्यात आला.

कन्हान शहरात शिवाजी नगर उपकेंद्र येथे नगर अध्यक्षा सौ. करूना आष्टनकर कन्हान न.प. मुख्याधिकारी मा.गीरिश बिन्नोरे नगरसेवक अनिल ठाकरे शिवसेना शहर प्रमुख छोटू राणे, हरीश तिडके, प्रदीप गायकवाड डॉ.चौधरी आणि संपूर्ण नर्सिंग स्टाफ यांच्या उपस्तीतिथ 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.प्रतिनिधी :- भारत पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या