Advertisement

ग्रा.प.आमडी(हिवरी) मौजा-हिवरी येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम सन 2020-21 प्रशिक्षण घेण्यात आले.

आमडी (हिवरी):- पारशीवनी तालुका कृषि विभागाचा वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम गट ग्राम.प.आमडी (हिवरी)मध्ये मौजा हिवरी मध्ये घेण्यात आला. दिनांक 4/02/2021 रोजी मौजा- हिवरी येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम सन 2020-21 प्रशिक्षण घेण्यात आले..

सदर प्रशिक्षणामध्ये जमिनीचे आरोग्य व सुपीकता टिकवणे आणि वाढविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करून रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खते जैविक खते सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या खतांचा वापर करणे व मातीचा नमुना कशा पद्धतीने घ्यावा ह्या विषयी मा.कृषी सहाय्यक जे.बी. भालेराव सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करणे व पुढील खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता अवशेष निर्मूलन करणे, हरभरा पिकावरील घाटे अळीचे एकात्मिक नियंत्रण इत्यादि विषयावर मा.मंडळ कृषी अधिकारी जी.बी.वाघ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले..

सदर प्रशिक्षणास   पंचायत समिती सदस्य सौ. निकिताताई भारद्वाज, ग्रा. पं. आमडी सरपंच सौ. शुभांगीताई भोस्कर, शिवसेना तालुका प्रमुख पारशिवानी राजू भोस्कर, कृ.स. ठोंबरे सर, साठे सर, देशमुख सर, राठोड ,ढंगारे, कृषी मित्र, श्रीधरभाऊ झाडे व शेतकरी बांधव उपस्थित होते..

शेतकीर प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ शुभांगी  राजु भोस्कर, प्रमुख पाहुने प.स.सदस्य सौ.निकीता भरद्धाज, ग्रा.प.सदस्य सौ.संगीता झाडे, कृषि मित्र संजय झाडे शेतकर्यांना प्रशिक्षण देतांना तालुका कृषि अधीकारी वाघ साहेब, कृषि साहायक भालेराव, कृषि अधीकारी ढंगारे मॅाडम, कृषि अधीकारी राठोड मॉडम यांच्या उपस्तित गावातील मान्यवर मोठ्या संखेत नागरीक शेतकरी व महिला वर्ग उपस्थीठ होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या