Advertisement

पारशिवनी नगरपंचायत नगरअध्यक्षा सौ. प्रतिभा कुंभलकर व मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या पुढाकाराने पथनाट्य द्वारे "स्वच्छ माझी पारशिवनी " जनजागृती मोहीम राबविण्यात आली

पारशिवनी:-पारशिवनी नगरपंचायत नगरअध्यक्षा सौ. प्रतिभा कुंभलकर व मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या पुढाकाराने स्वच्छ माझी पारशिवनी पथनाट्य द्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

संपूर्ण विदर्भात पहिल्यांदाच नगरपंचायत पारशिवनी येथे स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१ व माजी वसुंधरा अभियान बाबत वासुदेव फेरी पथनाट्य इत्यादि अभिनव कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृति करण्यात येत आहे.

 

सुन्दर तसेच कचरामुक्त शहर करण्यासाठी परशिवनी नगरपंचायत कार्यालयाने शहरातील नागरिकाना शहर कचरामुकत करण्याचे आवाहन करीत सतारा-सांगली येथील विद्यार्थ्यानी पथनाट्य सादर करुण शहरात जनजागृति केली जनजागृति करीत असताना शहरात कचरा होणार नाही.

याची कालजी कशी घेतली पाहिजे तसेच इतरत्र कचरा होणार नाही,हि शहरातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. हे सांगली-सातारा येथील पथनाट्य पथकातील मुला-मुलींनी नाटिका सादर करून जनजागृती केली.

शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी हि प्रशासन तसेच प्रत्येक नागरिकांची आहे.

हे या पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करून जण जागृती केली जात आहे,आपले शहर आपली जबाबदारीची भावना हि प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरा मुक्त होण्यास मदत होणार आहे.

यामुळे स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबविले जाऊ शकते. पथनाट्य पारशिवनी शहरातील, मुख्य ठिकाणी तसेच अनेक प्रभागात सादर करून जनजागृती केली.

प्रतिनिधी:- भारत पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या