स्थानी आमदार श्री आशीष जैसवाल यांच्या पुढाकाराने आता घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास मोफत वाळूच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.
तसेच वैयक्तिक वापरासाठी रॉयल्टी पासेस मिळणार व ग्राम विकासाच्या सामूहिक वापरासाठी सुद्धा वाळू मिळणार.
रामटेक विधान सभेचे आमदार श्री आशीष जैसवाल यानी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे राज्य शासनाने दि.२९/०९/२०२० च्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे
लवकरच योजनेची अंमलबजावणी होऊन नागरिकांना वाळू उपलब्ध होईल.
घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास मोफत वाळूच्या निर्णयाची अंमलबजावणी
वैयक्तिक वापरासाठी रॉयल्टी पासेस मिळणार , ग्राम विकासाच्या सामूहिक वापरासाठी ही वाळू मिळणार.
राज्यात अनेक वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने वाळूची उपलब्धता नाही त्यामुळे अनेकांना घराच्या बांधकामासाठी व घरकुलच्या लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने घर बांधण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
ही अडचण लक्षात घेता प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास मोफत उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरु होते.
त्यानुसार शासनाने दि. १७/११/२०१८ अन्वये स्वामित्वधन न आकारता आर्थिक दुर्बल घटकांकरिता असलेल्या शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजने अंतर्गत घराच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी देण्याची तरतुद करण्यात आली होती, परंतु त्याची अंमलबजावणी प्रलंबित होती.
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालया मार्फत गौण खनिज उत्खननाच्या अनुषंगाने दि. २८/०३/२०२० रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे.
सदर अधिसूचनेत पर्यावरण अनुमतीबाबत नव्याने तरतुदी करण्यात आल्या आहेत.
पर्यावरण अनुमती शिवाय ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या वाळू स्रोतातून प्रत्येकी ५ ब्रास वाळू उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे राज्य शासनाने दि. २९/०९/२०२० च्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे.
या सर्व विषयकरिता माझा पाठपुरावा सुरु होता.
दि. ०८/१२/२०२० रोजी आवास योजने संदर्भात Video Conferencing बैठक मध्ये आमदार श्री आशीष जैसवाल यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी, नागपूर यांची संबंधितांना सूचना दिल्या आहेत. लवकरच योजनेची अंमलबजावणी होऊन नागरिकांना वाळू उपलब्ध होईल.



0 टिप्पण्या