Advertisement

सुख-शांती समाधान योग ग्रुप तर्फे कन्हान मध्ये योग दिन उत्साहात


 सुख-शांती समाधान योग ग्रुप तर्फे कन्हान मध्ये योग दिन उत्साहात


कन्हान : - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुख-शांती समाधान योग ग्रुप, कन्हानच्या वतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे संजयजी गोयल, रामदासजी पोपळकर तसेच योग शिक्षक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गायत्री मंत्र पठणाने झाली.


यानंतर उपस्थितांनी विविध योगासने सादर केली. योगासनांवर आधारित नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढविली. योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीसाठी त्याची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सविता नाटकर यांनी मानले. योग दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सहभागी नागरिकांना फळांचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश काकडे, शेखर ठवकर, मिलिंद पोपळकर, जितेंद्र चौधरी, शांताराम जळते सर, संदीप माहुलकर, सजदेवे सर, रीना चोबे, प्रमिला वहिकर, सविता नाटकर, ललिता रेखाते, मीना कुंभलकर, मालती पोपळकर, लता जळते, इंगोले मॅडम आदींनी परिश्रम घेतले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या