कन्हानमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा ; गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव
कन्हान, दि. ६ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सनातनी धार्मिक संस्था कन्हान व गौ सेवा समिती कन्हान क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक येथील शिवपंचायत हनुमान मंदिर परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू आणि युवकांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक भरत सावळे हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक गजराज देवीया, शांतराम जळते, माजी सैनिक प्रवीण सतदेवे, कॅप्टन सतीश बेलसरे, ज्येष्ठ शिक्षक हरीश पोटभरे, पोलीस पाटील गुंडराव चकोले, इंद्रपाल वंजारी तसेच समाजसेविका मीना कळंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . यावेळी बारावीच्या परीक्षेत पारशिवनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणारी अविका पाहुणे (८९.१७ टक्के), द्वितीय क्रमांक प्राप्त करणारा राज चंद्रोल (८४.१७ टक्के) आणि तृतीय क्रमांकाची खुशी शाह (७२.८३ टक्के) यांचा शिल्ड व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला . तसेच दहावीच्या परीक्षेत पारशिवनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणारी आनंदी धोटे (९५.६० टक्के) हिचाही विशेष सत्कार करण्यात आला.
रामटेक येथे नुकत्याच पार पडलेल्या सिलंबम स्पर्धेत शिवशंभू आखाडा कन्हान, कांद्री व निलज तसेच परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा कन्हान-कांद्रीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध पदके पटकावली. कन्हान परिसराचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व खेळाडूंना पदक व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले .
याशिवाय हिंदुत्वाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणारे आयुष संतापे व हिमांशू सावरकर यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला . कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रसेवेचा संदेश दिला . तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर यांच्यासह लोकेश दमाहे, आयुष संतापे, हिमांशू सावरकर, जीवन नांदुरकर, वेदांत बावनकुळे , विनोद केने , राजन विनयवार , विनोद यादव , रमेश जयस्वाल , निखिलेश चकोले , उदय माहुरे , सुजल यादव व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या