Advertisement

राजे फाउंडेशन द्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप


राजे फाउंडेशन द्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप


कन्हान : - कन्हान शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला . या कार्यक्रमा निमित्त शाळेच्या वतीने राजे फाउंडेशनला निमंत्रण देण्यात आले होते . त्या अनुषंगाने राजे फाउंडेशनच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना कार्डबोर्ड , पेन-पेन्सिलसह संपुर्ण शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले .



हा उपक्रम राजे फाउंडेशनचे अध्यक्ष व कन्हान - पिपरी नगर परिषद चे नगरसेवक केतन भिवगडे यांच्या पुढाकारातुन राबविण्यात आला . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लागावा , तसेच पुढील अभ्यासासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे , या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन कन्हान  - पिपरी नगर परिषद चे लेखपाल विभागाचे अधिकारी नितेश तपासे , लेखा विभागाचे अधिकारी पवार साहेब , डॉ. अतुल बर्वे , नगरसेविका पूनम आशिष राठी , नगरसुधार समितीच्या अध्यक्षा छायाताई नाईक मॅडम उपस्थित होत्या .



मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाचे महत्त्व पटवुन दिले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविणकुमार साबरे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते . शैक्षणिक किट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत होता . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळुन पुढील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली .

Raje Foundation distributes educational kits to 10th grade students

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या