Advertisement

कन्हान शहर विकास मंच द्वारे ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


कन्हान शहर विकास मंच द्वारे ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


कन्हान : - कन्हान शहर विकास मंच च्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले .


कार्यक्रमाचे अध्यक्ष मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , प्रमुख अतिथि निलकंठ मस्के , सुर्यभान चकोले यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपति शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी आणि राष्ट्रगीत गायन करण्यात आले . निलकंठ मस्के , सुर्यभान चकोले , अर्चना तांडेकर यांनी प्रजासत्ताक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . उपस्थितांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन करीत प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन प्रदीप बावने यांनी केले . 


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , सुरज वरखडे , नाना ऊकेकर , प्रदीप बावने , चिंतामण शेंडे , महिला सदस्य अर्चना तांडेकर , मीना गिऱ्हे , सुषमा मस्के , रंजना किरपाने , निखिल मेश्राम , अभिषेक साखरे , माहेर इंचुलकर , यश शेंडे , रविंन्द्र कोच्चे , रुपेश मेश्राम , अभय ऊके , रुजल मेश्राम , प्रियांशु वाघमारे , प्रशांत मेश्राम , मयुर बावणे सह आदि नागरिक उपस्थित होते .

The-77th-Republic-Day-was-celebrated-with-enthusiasm

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या