सार्थ पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
कन्हान : - सार्थ पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वतंत्र भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
शनिवार (दि.२४) जानेवारी रोजी सार्थ पब्लिक स्कूल कन्हान या इग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम समाज सेवक नागोरावजी साबरे यांचे अध्यक्षेत , तर रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन कन्हान - पिपरी नगर परिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , कांद्री नगर पंचायत नगराध्यक्ष सुजित पानतावणे , शाळेचे संचालक भूषणराव निंबाळकर , नगरसेवक प्रशांत पाटील , नगरसेविका सूषमा चोपकर , यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.बी निंबाळकर , शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका दिपाली गीऱ्हे आदी प्रामुख्याने उपस्थित होते . या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी , के.जी वन ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर नुत्य , सामुहिक नुत्य , गायन , समुहगीत , नाटय प्रयोग तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी सादर करून उपस्थित दर्शकाना मंत्रमुग्ध केले .
सोमवार (दि.२६) जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शाळेच्या पटागंणात प्रजासत्ताक दिनी शाळेच संचालक भूषणराव निंबाळकर यांचे अध्यक्षेत लॉयन्स क्लब कन्हान कोल सिटी चे माजी अध्यक्ष भगवान नितनवरे यांचे हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगिताने सलामी देण्यात आली . यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन लॉयन्स क्लब कन्हान कोल सिटी चे माजी अध्यक्ष रंगराव पोटभरे , डॉ.श्रीकृष्ण जामोदकर आदीच्या प्रमुख उपस्थित स्वतंत्र भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला . दोन्ही कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सार्थ पब्लिक स्कूल कन्हान च्या प्रभारी मुख्याध्यापिका दिपाली गीऱ्हे , परिसर प्रभारी कु.सना अन्सारी , शिक्षिका दर्शना गायकवाड , चंदा कुसुंबे , मंगला बावणे , नेहा नायडु , दिपाली ठवकर , प्रतिमा चौधरी , कोमल लुहुरे , निशांत लोखंडे , व्ही.के साखरकर आदी सह शिक्षक - शिक्षके तर कर्मचारी वृंद पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या