Advertisement

कन्हान मध्ये तेली समाजाचा सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला


कन्हान मध्ये तेली समाजाचा सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला


कोरोनानंतर सहा वर्षांनी तेली समाजाचा भव्य मेळावा 


कन्हान-कांद्री येथे समाज एकत्रीकरण ; मान्यवरांच्या भाषणांतून सकारात्मक संदेश 


कन्हान : - श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान आणि कांद्री शहर यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजाचा सामाजिक कार्यक्रम संताजी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला .


कार्यक्रमाचे अध्यक्ष व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल बजाईत , प्रमुख पाहुणे शेखर सावरबांधे , माजी जिल्हा परिषद उपसभापती शरद डोणेकर , माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे , जिल्हा संपर्क प्रमुख सूर्यभान चकोले , सौ. कांचन माकडे , रमेश कारेमोरे , राहुल किरपान , पुरुषोत्तम पिसे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज , संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल–रुक्माई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . 


शेखर सावरबांधे यांनी आपल्या भाषणात सांगितले की , विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक व व्यावहारिक क्षेत्रातही स्वतःची भूमिका ठामपणे मांडण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे,” असे ते म्हणाले . श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे संस्थापक अनिल बजाईत यांनी अध्यक्षीय भाषणात समाजातील महिला, युवक, युवती व विद्यार्थ्यांना संधी व योग्य मार्गदर्शन देण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील , असा विश्वास व्यक्त केला .


कोरोनानंतर समाजात निर्माण झालेली दरी कमी करून पुन्हा संघटनबळ वाढविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली असून, असा सामाजिक मेळावा यापुढे दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावा, अशी ठाम मागणी मान्यवरांनी आपल्या भाषणांतून केली .


मेळाव्यात पदाधिकारी मेळावा , समाज एकत्रीकरण , कन्हान - कांद्री परिसरातील नवनियुक्त नगरसेवक व नगरसेविकांचा गौरव करण्यात आला . तसेच महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला असुन हा कार्यक्रम कोणत्याही एका संघटनेपुरता मर्यादित नसून संपूर्ण तेली समाजासाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले . रामटेक विधानसभा क्षेत्रातील हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे समाजातील एकोपा , विश्वास व संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडले .


कार्यक्रमा दरम्यान महिलांसाठी दिनचर्या व आरोग्यविषयक मार्गदर्शन सहजोग माताजी संस्था सदस्यांच्या वतीने करण्यात आले . यावेळी तेली समाजातील एमपीएससी , यूपीएससी , आयआयटी , वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी - विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला . यासोबतच समाजातील ज्येष्ठ नागरिक , उच्चशिक्षित व्यक्ती , सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा गौरव करण्यात आला .


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना निलकंठ मस्के यांनी केली , तर आभार प्रदर्शन अमित मेघरे यांनी मानले .

A social event of the Teli community was held with great enthusiasm in Kanhan.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर अध्यक्ष सुनील सरोदे , कार्याध्यक्ष ऋषभ बावनकर , कांद्री शहर अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , कन्हान शहर महिला अध्यक्षा सुषमा मस्के , सुनीता मानकर , ममता आष्टणकर , मीनाताई कळंबे , सुषमा चोपकर , विभा पोटभरे , निर्णय कुंभलकर , अविनाश कांबळे , भगवान लांजेवार , राजेश पोटभरे , यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या