रोजगार मुद्यावर आंदोलन करणाऱ्या नागरिकांन वर पोलीसांचा लाठीचार्ज
सरपंच , उपसरपंच , सदस्य सह महिलांना आणि नागरिकांना अटक , तनावाची स्थिती निर्माण
कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याचा मुद्यावरुन आंदोलन करणाऱ्या नागरिकांन वर पोलीसांनी लाठीचार्ज केला . घाटरोहणा ग्रामपंचायत सरपंच किशोर मेहुणे , उपसरपंच अशोक पाटील यांचा सह शैकडो महिलांना , नागरिकांना व आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने गावात तनावाची स्थिती निर्माण झाली आहे .
महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याचा मागणीसाठी २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत सरपंच किशोर मेहुणे यांचा नेतृत्वात बेमुदत आंदोलन केले होते . ज्यावर प्रकल्पाचे मुख्य अभियंता कुमार वार , कनिष्ठ अभियंता राठोड यांनी २६ सप्टेंबर रोजी कंपनीच्या कार्यालयात पारशिवनीचे तहसीलदार , कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा उपस्थिति मध्ये आंदोलकांच्या शिष्ठमंडळाची बैठक बोलवुन सकारात्मक चर्चा करुन मागण्या मान्य केले . प्रोजेक्ट फेजमध्ये कंत्राटदारा कडे तात्काळ ८ तरुणांना रोजगार देण्यात येईल आणि उर्वरित ८ तरुणांना एका महिन्याचा अंतरावर जागेच्या उपलब्धतेनुसार घेण्यात येईल असे लिखित स्वरुपात पत्र दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते .
मुख्य अभियंता कुमार वार यांनी दिलेल्या पत्रा नुसार चार महिने लोटुन सुद्धा अद्यापही स्थानिकाला रोजगार उपलब्ध करुन दिले नाही . सरपंच किशोर मेहुणे , उपसरपंच अशोक पाटील आणि ग्रामस्थांनी अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा देखील केली . परंतु अधिकार्यांन कडुन उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाला . शासनाच्या २००८ च्या जी.आर.नुसार कोणत्याही ठिकाणी खाजगी किंवा सरकारी प्रकल्प , कंपन्या , कारखाने, सुरु झाले असल्यास किमान ५०% जागा स्थानिक लोकांसाठी राखीव असतात . मात्र प्रशासन आपल्याच निर्णयांची उल्लंघण करून बाहेरील लोकांना रोजगार देत आहे व स्थानिक लोकांचे रोजगार हिसकावत आहे , असे ग्रामस्थान कडुन बोलले जात आहे .
या मुद्यावरुन बुधवार (दि.२४) डिसेंबर रोजी सरपंच किशोर मेहुणे यांचा नेतृत्वात शैकडो नागरिक महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पा समोर आंदोलन करणार होते . परंतु पोलीस विभागाने आंदोलन सुरु होण्यापुर्वीच सरपंच किशोर मेहुणे यांना त्यांचा निवास स्थावरुन अकट केल्याचे ग्रामस्थानी सांगितले . सरपंचांना अटक झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेत आंदोलन सुरु केले . बघता बघता आंदोलन उग्र झाल्याने पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला .
उपसरपंच अशोक पाटील , सदस्य तेजराम सरीले , सिद्धार्थ पाटील , सुनील पाटील , अमीत छानीकर , प्रशांत वाटकर , संजय छानीकर , आशा लोखंडे , सुनीता तांडेकर , केशरबाई बेहुणे , ज्योती भतोडे , दुर्गा पाटील , सुनंदा निस्तानी , लता छानीकर , सुशीला बोंद्रे , प्रमीला पाटील , शालु पाटील सह शैकडो महिलांना व आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले . यामुळे गावात तनावाची स्थिती निर्माण झाली आहे . आंदोलनकर्त्यांना नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय येथे नेऊन प्रतिबंध कारवाई करुन सायंकाळी सोडण्यात आले . घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांन मध्ये तीव्र आक्रोष निर्माण झाला आहे . स्थानिकांनी तातडीने रोजगार देण्याची मागणी केली आहे .


0 टिप्पण्या