धर्मराज प्राथमिक शाळेला "उपक्रमशील शाळा" पुरस्कार प्रदान
शाळेतील विविध उपक्रमांची शासनस्तरावर दखल
कन्हान : - पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत असलेल्या धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री - कन्हान ला विद्यार्थी गुणवत्तावाढ व आनंददायी शिक्षणासाठी राबवित असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमासाठी " उपक्रमशील शाळा" हा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले . पंचायत समिती येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात गटविकास अधिकारी यांच्या हस्ते मुख्याध्यापक खिमेश बढिये यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
खाजगी व्यवस्थापनाच्या सर्वाधिक पटसंख्या असलेल्या धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी गुणवत्ता वाढ व आनंददायी शिक्षणासाठी गेल्या चार वर्षांपासून मुख्याध्यापक खिमेश बढिये शिक्षक व पालकांच्या सहयोगातून विविध नवनवीन उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करीत आहे .
प्रत्येक मूल १०० % शिकू शकते मात्र त्यासाठी तो १००% शाळेत उपस्थित राहिला पाहिजे यासाठी शाळा प्रशासन संस्थापक अध्यक्ष श्री खुशालराव पाहुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करीत आहे . शाळेत नियमितपणे सहशालेय उपक्रमासोबतच ६००० दिव्यांचे रंगकाम , विद्यार्थी उपस्थितीसाठी अभिनंदन वर्ग , मातीकलेतून मूर्तीकाम , एक राखी सैनिकांसाठी यासोबतच यावर्षीपासून वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी "अभिनंदन विद्यार्थी.... I am a shining star" या उपक्रमाचे आयोजन करुन जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरु केली . शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची दखल तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा , आयुक्त कार्यालय नागपूर येथील उपायुक्त (विकास) डॉ.कमलकिशोर फुटाणे , शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळूसे यांनी घेऊन वेळोवेळी सत्कार केला आहे .
धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षण व गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची दखल घेत पंचायत समिती पारशिवनी तर्फे गटविकास अधिकारी यांच्या हस्ते शुक्रवार (दि.१५) स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात "उपक्रमशील शाळा" हा पुरस्कार मुख्याध्यापक यांना प्रदान करण्यात आला . गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक गटविकास अधिकारी उमेश नैतामे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी हा पुरस्कार स्विकारला . यावेळी सहायक प्रशासन अधिकारी चंद्रहास पाटील , गटशिक्षणाधिकारी सुनील कोडापे , कृषी अधिकारी चंद्रकांत देशमुख , माजी उपसभापती चेतन देशमुख , सामाजिक कार्यकर्ते उमराव निंबोने , पत्रकार विजय भुते , विस्तार अधिकारी वाघ , कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरुण काळे , सहकारी शिक्षक गणेश खोब्रागडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
धर्मराज प्राथमिक शाळेतील विद्यार्थी , शिक्षकवृंद व पालक यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याचे मत मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी व्यक्त केले . आगामी काळात ३६५ दिवस शाळा व "ग्राम शाळा संसद" या उपक्रमावर काम करणार असल्याचे सांगितले . शाळेला मिळालेल्या या मानांकनाबद्दल संस्थापक अध्यक्ष खुशालराव पाहुणे , गटविकास अधिकारी सुभाष जाधव , गट शिक्षणाधिकारी सुनील कोडापे , शिक्षक नेते मिलिंद वानखेडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विधिलाल डहारे यांच्यासह विविध स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या