Advertisement

ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान द्वारे ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा |


ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान द्वारे ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा


कन्हान : - ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान व्दारे स्वामी विवेकानंद नगर येथे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार मा. प्रकाशभाऊ जाधव यांच्या अध्यक्षेत , माजी नगरसेविका राखी परते यांचे हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे , माजी नगरसेविका गुंफा तिडके यांचे हस्ते महात्मा गांधी , पोतदार सर यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे , एकनाथ खर्चे सर यांचे हस्ते ध्वज पुजन करून जेष्ट महिला बीरे काकु यांचे हस्ते ध्वजारोहन करून तिरंगा झेंडयाला सलामी देऊन देशाला स्वातंत्र प्राप्ती करिता बलीदान देणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . 

यावेळी डॉ.जामोदकर , डॉ.जुनघरे , डॉ.काठोके , नरेंद्र वाघमारे , किशोरी अरोरा , ताराचंद निंबाळकर , मधुकर नागपुरे , बाला नायर , विठ्ठल मानकर , नामदेव नवघरे , शालीकराम ठाकरे , विजय डोणेकर , अशोक पोटभरे , कोठीराम चकोले , शांताराम जळते , प्रविण सातदेवे , चंद्रशेखर कळमदार , नेवालाल पात्रे , ज्ञानेश्वर दारोडे आदी सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी सेवानिवृत सैनिक रवि राघव रंग , माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव सर , पी.पी.पोतदार सर , लताताई वंजारी , राखी परते यांनी स्वातंत्र प्राप्ती च्या इतिहासावर सुंदर मार्गदर्शन केले . देशाला स्वातंत्र प्राप्तीच्या ७८ वर्षा नंतर ही उपासमारी, बेरोजगारी , महागाई , महिलावर होणारे अत्याचार , जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी यांच्या शेतमालास हमीभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी होत आत्महत्या करित आहे . 

अश्या विविध समस्या सुटत नसल्याची खंत व्यकत करून आपण प्रत्येकांनी भारतीय नागरिक म्हणुन आपल्या कर्तव्याचे योग्य पालन करून कार्य केल्यास याही गंभीर समस्येचे निराकरण होऊ शकते . करिता आपण सर्वानी भारताचे कर्तव्यनिष्ठ , जागरूक नागरिक म्हणुन कार्य करणे ही काळाची गरज आहे . असे अध्यक्षिय मार्गदर्शनात मा.प्रकाश भाऊ जाधव यांनी संबोधित करून सर्वाना ७९ व्या स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वाना अल्पोहार व चाय वितरण करून स्वातंत्र दिन कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश पांजरे यांनी तर सुत्रसंचालन रविंद्र चकोले यानी केले . 

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिलीप राईकवार , मोतीराम रहाटे , सचिन साळवी , अशोक हिंगणकर , रूपेश सातपुते , हबीब शेख , पुरूषोत्तम येणेकर , संतोष गिरी , गोविंद जुनघरे , प्रशात येलकर , प्रतिक जाधव , प्रविण गोडे , जीवन ठवकर , राजेश गणोरकर , मनोज गुडधे , अशोक मेश्राम , निशांत जाधव , यशवंत खंगार , दामोधर बोकडे , क्रिष्णा केझरकर , तेजस रोडेकर , संजय वानखेडे आदिंनी सहकार्य केले . 

79th-Independence-Day-celebrated-with-great-enthusiasm-by-GramAunnati-Seva-Pratishthan-Kanhan


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या