टेकाडी येथे हनुमान मंदिरात रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव सप्ताह भव्य महाप्रसादा ने उत्साहात संपन्न
दही काला करून सतत २४ तास उभ्या अखंड भजन सप्ताहा चा समारोप
कन्हान – अनेक वर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी टेकाडी येथे श्री हनुमान मंदीर पंच कमेटी टेकाडी व्दारे श्रारीम नवमी च्या पुर्व संध्येला भव्य शो़भायात्रा व दुसऱ्या दिवशी रामनवमी ला पुजा अर्चना, घटस्थापना करून श्रीराम नवमी ते श्रीहनुमान जयंती पर्यंत अखंड भजन सप्ताहा चा श्री हनुमान जयंती ला घट विसर्जन करून उभ्या अखंड भजन सप्ताहाचा दही काला करून व सायंकाळी भव्य महाप्रसादाने श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आला.
बुधवार (दि.२९) मार्च ला श्री हनुमान मंदीर पंच कमेटी टेकाडी व्दारे श्री राम नवमी च्या पुर्व संध्येला भव्य पालखी, शोभायात्रा काढुन गाव भ्रमण करण्यात आले.यात बालगोपालांनी विविध वेशभुषा जसे श्री राम, लक्ष्मण, सीता व हनुमान च्या साकारल्या होत्या.
शाळेकरी मुलांची लेझिम, गुरुकृपा मर्दानी आखाडा राम सरोवर टेकाडी यांनी शिवकाळीन कले चे प्रात्याक्षिक सादर केले.विशेष म्हणजे भोले नाथ हे बैलबडी वर विराजमान झाले होते. पालखी शोभायात्रेचे पुजन, आरती, फुलाचा वर्षाव तसेच महिलांनी स्वागत केले. गाव भ्रमणात कुठे शरबत कुठे नाश्त्याची, मठ्ठा वितरण करून स्वागत करण्यात आले.मंदीरात पोहचुन पुजा, अर्चना व आरती करून सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी गुरूवार (दि.३०) मार्च ला श्रीराम नवमी ला सकाळी पुजा, अर्चना घटस्थापना करून अखंड भजन सप्ताहा सुरू करून सतत सात दिवस २४ तास अखंड भजन गायन करण्यात आले.
या मध्ये गाव व गावा बाहेरील श्री देवमनजी हुड भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, जय रघुनंदन भजन मंडळ, आरतीगण भजन मंडळ, जय माँ दुर्गा भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ आदी भजन मंडळानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.श्री हनुमान मंदिराला विशेष मनमोहक विधृत रोषणाई केली होती.
श्री हनुमान जयंती च्या दिवशी अखंड भजन सप्ताहाची समाप्ती व घटविसर्जन करून महाआरती आणि सायंकाळी भव्य पाचपक्वान चा महाप्रसाद वितरण करून अखंड भजन सप्ताहाची सांगता करण्यात आली. पंचकोशीतील गावकरी, भाविकांनी भव्य महाप्रसादाचा मनसोक्त लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री हनुमान मंदिर पंच कमिटी टेकाडी चे अध्यक्ष श्री पंढरीजी बाळबुधे, उपाध्यक्ष नंत्थुजी माेहाडे, सदस्य गाेपीचंद गुरधे, गुलाबजी राऊत, साहारे गुरूजी, देवेंद्र सिंह सेंगर, मनोज लेकुळ वाळे, सतिश घारड, मनोज गुडधे, दिवाकर ऊमाळे, चीरकुट हुड, दादाराव राऊत, मनोहर सातपैसे, नंदुजी लेकुळवाळे, बळीराम सातपैसे, सुरेश खोरे, सुरेश माेरे, देवमन हुड, रवी माेरे, राजु शेंदरे, विलास राऊत, बाला वाघमारे, नाना कांबळे, जनाधन सातपैसे, सुरेश हुड, विलास फुलारे, वासुदेव नागाेसे, मारुती बाेरघरे सह संपुर्ण ग्रामस्थानी सहकार्य केले.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या