धर्मराज प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी
शिवाजी महाराजांसारखे राजे होणे नाही- मुख्याध्यापक मा. खिमेश बढिये यांचे प्रतिपादन
कन्हान-शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. जवळजवळ चारशे वर्ष उलटल्या नंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही मराठी मनावर कायम आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवली. चारशे वर्षांपूर्वी रोवलेल्या या बीजाचे पुढे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले . असे राजे पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा.खिमेश बढिये यांनी केले.
धर्मराज प्राथमिक शाळेत सोमवार दिनांक २० फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मा. खिमेश बढिये , प्रमुख अतिथी पर्यवेक्षक मा.सुरेंद्र मेश्राम, ज्येष्ठ शिक्षिका सौ.चित्रलेखा धानफोले प्रामुख्याने उपस्थित होते .
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी बाल शिवाजी, मा जिजाऊ व मावळ्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते.
सर्वप्रथम या वर्षी पासून जय जय महाराष्ट्र माझाया राज्यगीताचे गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले . वेशभूषेत बाल शिवाजी म्हणून स्वराज वाडीभस्मे , जिजाऊ म्हणून मृणाली पाटील, मावळा म्हणून वंश भादे यांना उत्कृष्ट सजावट म्हणून स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन मा.अमीत मेंघरे यांनी तर आभार मा.भिमराव शिंदे मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजना साठी मा.किशोर जिभकाटे , कु. हर्षकला चौधरी , कु.शारदा समरीत , कु.अर्पणा बावनकुळे , कु. प्रिती सुरजबंसी , कु. पूजा धांडे , कु.कांचन बावनकुळे , सौ. सुनीता मनगटे , सौ. सुलोचना झाडे , सौ.नंदा मुद्देवार सह आदि शिक्षक , शिक्षिकांनी सहकार्य केले.
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर-कन्हान


0 टिप्पण्या