Advertisement

घरी सिलिंग च्या लोखंडी कडीला सुती दोरी ने गळफास घेऊन ईसमाने केली आत्महत्या

घरी सिलिंग च्या लोखंडी कडीला सुती दोरी ने गळफास घेऊन ईसमाने केली आत्महत्या

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या पोस्ट आॅफिस जवळ होम पाईप गेट कंपनीच्या गेट समोर मृतक कोमल पाटील याने राहत्या घरी सिलिंग च्या लोखंडी कडीला सुती दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी राकेश पाटील यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मृतक कोमल चिंतामण पाटील वय ४१ वर्ष रा.जुन्या पोस्ट आॅफिस जवळ होम पाईप कंपनीच्या गेट समोर हा डिप्रेशन मध्ये होता आणि त्याचा उपचार मनोविज्ञानिक डाॅक्टर कडे सुरु होता . मृतक कोमल आपल्या राहत्या घरी झेराॅक्स , स्टेशनरी , लॅमिनेशन , दुकान सांभाळत होता .

डिप्रेशन च्या बीमारी ने कंटाळुन कोमल याने शुक्रवार (दि.२४) फेब्रुवारी ला रात्री ११:३० ते शनिवार (दि.२५) फेब्रुवारी ला सकाळी ८:०० वाजता च्या दरम्यान राहत्या घरी सिलिंग च्या लोखंडी कडीला सुती दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केली . परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे , हरीष सोनभ्रदे , सम्राट वनपर्ती यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेले. मृतक कोमल याचे शवविच्छेदन करुन दुपार ला मृतदेह नातेवाईकांना सौपवुन कन्हान नदी शांती घाटवर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी राकेश चिंतामण पाटील वय ४७ वर्ष राह.मु.प्लाट नंबर १८ ए.मुरलीधर सोसायटी गायत्री नगर झिंगाबाई टाकळी नागपुर यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग क्रमांक ७२३ कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते हे करीत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या