Advertisement

कन्हान ला जागतिक अपंग दिवस थाटात साजरा

कन्हान ला जागतिक अपंग दिवस थाटात साजरा

संघर्ष दिव्यांग संघटना कन्हान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – भुमिपुत्र संघर्ष दिव्यांग संघटना कन्हान द्वारे जागतिक अपंग दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात करून अपंग दिवस थाटात साजरा करण्यात आला .

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ तेजस्वीनी गोतमारे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी डॉ तेजस्वीनी गोतमारे हयांनी अपंग दिना निमित्य शासनाच्या विविध अपंग बांधवा करिता असलेल्या योजने ची माहिती देऊन अपंग बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अपंग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन अपंग नोंदणी व कागदपत्रे तपासुन घेतले .

कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी भुमिपुत्र संघर्ष दिव्यांग संघटना कन्हान अध्यक्ष अश्विन भिवगडे, उपाध्यक्ष प्रविण शेंडे, मार्गदर्शक राजु राऊत, कार्याध्यक्ष सुभाष मेश्राम, राजेश्वरी, रंगराव ठाकरे, अस्लम शेख, प्रविण माने, अब्दुल खान , कैलाश सुर्यंवंशी, आयुष संतापे, वाणिजा मेश्राम, रंजिता मेश्राम, सुनिता कारेमोरे, पिंकी श्रीवास्तव दिव्यांग बांधवा सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या