Advertisement

टेकडी ईथे २५६६ वा बुद्ध पौर्णिमा निमित्त सामोहिक बुद्ध वंदना

टेकडी ईथे २५६६ वा बुद्ध पौर्णिमा निमित्त सामोहिक बुद्ध वंदना

टेकाडी/गोंडेगाव(पारशिवनी):-  सर्वप्रथम विश्व शांतीचे जनक, जगातील पहिले शास्त्रज्ञ, मृत्यू हे अंतिम सत्य असल्याचे जाहीर प्रतिपादन करीत विज्ञानवादी, विचारसरणी जनमानसात रुजविणारे,महिला पुरुष समान संदेश देणारे महाकारुणीक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा २५६६ वा महान जन्मदिन अत्यंत थाटामाटात (रामटेक विधानसभा क्षेत्रातील) टेकाडी गावात मोठया आनंदात साजरा करण्यात आला.

टेकाडी गावातील मंगेश काठोके यांचा घरा समोरील मंदिर परिसरातील पटांगणात  बुद्ध पौर्णिमा निमित्त सामोहिक बुद्ध वंदना आयोजित केली गेली.तथागत बुद्ध , आणि बोधिसत्व भारतीय संविधानाचे  शिल्पकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून  जगाला युध्दाची नव्हे तर केवळ आणि केवळ शांतीजनक तथागत बुद्धांचीच गरज असल्याचे मंगेश काठोके आयोजक तसेंच प्रमुख मार्गदर्शक यांनी सांगितले.

यावेळी महिला वर्ग मोठया संख्येने असून बऱ्याच महिलांनी तसेच पुरुषांनी कार्यक्रमात सहभाग घेतला,आणि मार्गदर्शन केले, प्रामुख्याने उपस्थित पार्बता ताई भेलावे, प्रमिला आई काठोके, कळवती सोनटक्के, सविता कश्यप, तुळसाबाई, फुलनबाई उंदेरीया, कमल बाई धोटे, शीतल पुंडे,प्रमिला बागडे,लक्ष्मीताई कोलते, सुरेश काका हुळ, शुभम राऊत, अनिल हुळ, विकास भलावी, शुभम वकलकर, स्वदेश भोवते,सारंग भाऊ हुळ,कुणाल काठोके, मंगेश सोनटक्के,आयोजक -गणेश हुळ, अमित इंगळे,पंकज हुळ आशिष थोटे, आभार सुरेश काका हुळ यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या