Advertisement

कर्तव्य दक्ष तलाठी पवार यांच्या दक्षतेने अवैध वाळू तस्करीत ट्रॅक्टर जप्त

कर्तव्य दक्ष तलाठी पवार यांच्या दक्षतेने अवैध वाळू तस्करीत ट्रॅक्टर जप्त.

कर्तव्यदक्ष तलाठी पवार यांचे सर्वत्र होतोय कौतुक

ब्रम्हपुरी – अवैध वाळुचा उपसा करून ती वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून नेत असताना महसूल कर्मचारी तलाठी श्री पवार यांनी धाड टाकून ट्रॅक्टर पकडला व त्यांच्यावर बऱ्याच लोकांचा ट्रॅक्टर सोडन्याकरिता प्रेशर येत असतानाही कुणालाही न घाबरता आपले कर्तव्य पार पाड़त ट्रक्टर पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी येथे  करण्यात आला.

असून जप्ती नामा तयार करण्यात आले आहे.ट्रॅक्टर जॉन डिअर ह्या कंपनीचे MH34 TC 0068 हे नंबर असलेले किमिंदा सेलोकर असून ट्रॅक्टर  संदीप रामाजी धांडे पिंपळगाव हे चालवत होते. बातमी लावेपर्यंत अजुन ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात जमा असुन यावर पुढील कार्यवाही काय करण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कर्तव्यदक्ष तलाठी श्री. पवार यांची सर्वत्र स्तुती होत आहे.

राहुल भोयर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या