शिहोरा(कन्हान) गावात जन समस्या निवारण सभा च्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्यांचे निवारण
शिहोरा/कन्हान:-
विषयावर कन्हान मधील शिहोरा गावात जन्सामास्या स्थानिक आमदार आशिष जैस्वाल (रामटेक विधानसभा) तसेच खासदार कृपाक तुमने (रामटेक लोकसभा) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सभा घेण्यात आली. वेगवेगळ्या विषयावर व जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याकरीता प्रशासनाची संपूर्ण टीम प्रामुख्यानी होती.
शिहोर गावातील नामवंत मोडलिंग मध्ये पारितोषिक विजेते, कुमारी माही नंणारे हिचा आमदार तसेच खासदार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून जन समस्या निवारण सभेची सुर्वात करण्यात आली.

गावातील समस्यांचे निवारण करून गावातीलो जनतेला शासकीय योजनेचा लाभ कसा घेता येणार ह्याचा मोठ्या पातळीवर विचार करून लवकरात लवकर अंमल बजावणी करण्याचे आदेश ह्या वेळेस अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शिहोरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र ची अवस्था लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नर्सेस, म्याट्रन, ला गाव पातळीवरील प्रश्न विचारून, आपल्या कामाला प्राथमिकता देऊन गावातिक जन समस्या लवकरात लवकर मोकळे करा, व वेळेत आपल्या डीवटीवर उपस्तीत राहून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या. असे सक्तीचे निर्देश ह्यावेळेस देण्यात आले. शिहोरा प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) मध्ये जवळपास ५ विभाग आहेत, MG नगर,वाघधरे वाडी, शिहोर, लेबर काम्प,सत्रापूर इत्यादी विभागावर जात्तीने लक्ष देण्याची ग्वाही PHC च्या अधिकार्यान मार्फत देण्यात आली.
शिहोरा गावात विद्युथ पुरवठा व्याव्स्तीठ नसल्यानी संतापात गावकरी आपली बाजू मांडत, विध्युथ विभागाचे वरिष्ठ अभियंता यांना आदेश देण्यात आले कि गावात स्ट्रीट लाईट नाही, गावात लाईट जाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे,त्याची लवकरात लवकर दखल घेऊन सुविधेची पूर्तता करण्यात यावी.
रास्त राशन संदर्भात व राशन कार्ड च्या संद्रभात गावात नवीन नियोजन करण्यात आले. शिहोरा हे गाव कान्हान पासून जवळपास ३ किमी अंतरावर अंतरावर आहे, व तेथिल समस्त जनतेला प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी कन्हान ला धाव घ्यावा लागतो. आमदार आशिष जैस्वाल व खासदार कृपाल तुमाने यांच्या अदेशानी आता गावात सीधा वाटप केंद्र उघडले जाणार, व ह्या नंतर गावातील संपूर्ण राशन धारकांना शिहोरा गावातच राशन वाट होणार. गरीब परिवाराला नवीन शासकीय योजनांचा कश्या प्रकारे राबविता येणार ह्याची देखील ह्यावेळेस चर्चा करण्यात आली.
शिहोरा गावाची दळणवळण ची व्यवस्था व समस्या विचारार्थ घेता गावापर्यंत रोड बरोबर नाही रोड ची अवस्था इतकी बिकट आहे कि शिहोरा गावात साधारण रिक्षा पण जात नाही. ह्या सर्व अडचणीची दाखल घेता आमदार आशिष जैस्वाल यांनी ५०लाख रुपये ची निधी उपलब्ध करून शिहोरा गावाला कन्हान शहर सी जोडणारा मार्ग यांचे नाविनी करण करून गावकरी व इतर बाहेरील साधनांना सुद्धा गावाशी जोडण्यास सोप होईल. बाहेरून येणार्या लोकांना समजत नाही कि नेमक गावाचा रस्ता कुठून आहे, ह्यासाठी गावाची ओळख व ल्यांडमार्क म्हणून मुख्य रोड च्या सुरवातीला गावाच्या मुख्य द्वार निर्मान करून मोठ्या अक्षरात गावाचे नाव देण्यात यावे. अशी मागणी नगर सेवक राजेश यादव यांनी केली.
गावात सुरु असलेले अवैध धंदे बंध करण्या करीता कन्हान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना विचारणा करण्यात आली. व गावात सुरु असलेले अवैध धंदे व अवैध दारू विक्रीला बंद करण्यात यावा ह्यासाठी महिला पुढाकारांनी, आमदार तसेच खासदार यांनी दखल घेऊन कन्हान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सक्तीचे निर्देश देऊन अवैध धंदे बंद करण्याचा आदेश दिले.

गावात घनकचरा उचलणारी घंटा गाडी येत नसल्यानी गावात मोठ्या प्रमाणात घानेचे प्रमाण वाढत असल्यानी डासाचे प्रमाण वाढत आहे व गावात औषद फवारणी होंत नाही व फोगिंग होत नसल्यानी गावात घानेचे प्रमाण वाढले आहे. इत्यादी विषयीची समस्या आयकून घेऊन गावात घन कचरा उचलणारी घंटा गाडी व फोगिंग केली जाणार याची ग्वाही आमदार व खासदार यांनी दिली. त्याच बरोबर गावातील अतिक्रमण चा विषय हाती घेऊन पट्टे वाटपाचा विषय मोकळा करू, ह्यासाठी विशेष अधिकारी यांची सभा आयोजित करून पट्टे वाटपाचा कार्यक्रम पूर्ण करणार, अशी ग्वाही आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली.
ह्या वेळी आरोग्य विषयी योजनेची माहिती जनतेला देण्यात आली व महात्मा फुले जीवनदाई योजने विषयी माहिती देण्यात आली व महात्मा फुले जीवनदाई योजनेच्या लाभ करीता कुठल्याही BPL कार्ड ची गरज पडत नाही. महात्मा फुले जीवनदाई योजनेच्या लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साधारण रेशन कार्ड नि लाभ घेता येतो. महात्मा फुले जीवनदाई योजनेच्या माध्यमातून फ्री मध्ये उपचार करता येतो. असे आमदार यांनी जनतेला समजाऊन सांगितले
गावातील घरकुल समस्येचा आढावा घेत व माहिती घेत जनतेच्या माहिती प्रमाणे शिहोरा गावात आतापर्यंत ज्यांना घरकुल किवा रमाई आवास योजनेचा किंवा इतर कुठल्याही आवास जोजनेचा लाभ घेतला नाही अस्य गरजू जनतेला आवास योजने पासून वंचित ठेवले जाणार नाही असे आमदार आशिष जैस्वाल यांनी आपले मत स्पष्ट व्यक्त केले.
ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्तीत:-
आमदार श्री आशिष जैस्वाल (रामटेक विधानसभा)
खासदार श्री कृपाल तुमाने( रामटेक लोकसभा)
श्री वर्धराज पिल्ले (नागपूर उपजिल्हा प्रमुख,शिवसेना), शुभांगी घोगले, तहसीलदार,कन्हान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे,
कन्हान न.प.अध्यक्षा करुणा अष्टनकर, उपाध्यक्ष डायनल शेंडे, नगर सेवक अनिल ठाकरे, मोनिका पौनीकर, राजेश यादव, राजेंद्र शेंद्रे,
तालुका प्रमुख राजू भोस्कर, कन्हान शहर प्रमुख छोटू राणे, मनीषा चिखले, वैशाली श्रीखंडे, लता लुन्ढेरे, प्रेम रोडेकर,भारत पगारे,सुत्तम मस्के,मनोज बैठ्वार,उमेश पौनीकर,चिंटू वाकुडकर,शमशेर पुरवले, व समस्त गावकरी प्रामुख्यानी उपस्तीत होते.


0 टिप्पण्या