कन्हान:- कन्हान मध्ये शिवसेना महिला आघाडी ने अवैध धंद्याला बंद करण्यासाठी PI व SP ला दिले लेखी निवेदन देऊन कार्यवाही न झाल्यास महिला विकास आघाडी तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे लेखी देण्यात आले.
निवेदन SP राकेश ओला यांना देण्यात आले
नगर पालिका कन्हान-पिपरी क्षेत्रात विना परवाना धारक दारू, चरस, हातभट्टीदारू, ताडी,जुगार तसेच गांजाची उघडपनाणे होणारी विक्री बंद करणेबाबत.नगराध्यक्षा नगर परिषद कन्हान-पिपरी यांचे पत्र क्र.२१३६/२०२० दिनांक.२९/०७/२०२०. ला देण्यात आले होते,
तरी देखील, इतके दिवस ओलांडून सुद्धा काहीच कार्यवाही झाली नाही असे स्पष्ट कन्हान नगर अध्यक्ष सौ. करुना आष्टनकर यांनी सांगितले.कन्हान पोलीस ठाण्याचे इंस्पेक्टर श्री.अरुण त्रिपाठी हे आहेत. व यांना लेखी तक्रार देऊन संभाषणाच्या 
कन्हान-पिपरी नगर परिषद च्या क्षेत्रात विना परवाना धारक विक्रेता मार्फत दारू, चरस, हात भट्टी दारू, ताडी तसेच गांजाचा व्यापार सुरु आहे. संचारबंदीच्या काळात पोलीस स्टेशन कन्हान ला वर्णन केलेल्या नुसार यापूर्वीहि याबाबत पत्र क्र.२१३६/२०२० दिनांक.२९/०७/२०२०. ला देण्यात आले होते, परंतु त्यावर पोलीस स्टेशन कन्हान तर्फे कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाल्याची दिसून येत नाही.
त्यामुळे तसेच सुरु असलेल्या या अवैध धंद्याचा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग ४७ चा दोन्ही बाजूंनी पोलीस स्टेशन कन्हान पासून ते आंबेडकर चौक पासून ते पिपरी गाडेघाट रोडावर पान ठेल्यात तसेच उघड्यावर दारू, चरस व गांजाची विक्री केली जात आहे तसेच मोठ-मोठे जुव्याचे अड्डे चालविले जात आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्गावरील दारूचे दुकान रात्री उशिरा पर्यंत सुरु असतात. गोंडेगाव कोळसा खादानाहून तारसा रोड या मार्गांनी अवैध पद्धतीने मोठ मोठ्या वाहनाने कोळस्याचे नेआण केली जात आहे.
तसेच, भारतात गोमांस व गायची तस्करी वर पूर्ण पने बंदी असून सुद्धा, मध्य प्रदेश मार्गाहून गायची खूप मोठ्या संख्येने तस्करी होत आहे, रात्री अप-रात्री मोठ्या वाहनाने भरलेली ट्रक व पिकअप मध्ये नेहमी महामार्गावर आढळली जाते व सिहोरा होता-होता ती वाहन नागपूर ला नेली जातात. ह्याविषयावर देखील शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी चर्चा केली, व त्यांना सुझाव सुचविण्यात आले.
या सर्व अवैध धंद्याची कन्हान पोलिसांना पुरेपूर जाणीव असून याबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार राज्य उत्पादन शुल्क यांचे कडे असते असे आम्हाला सांगण्यात येत आहे. शहरात पोलीस स्टेशन येथे कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून सुद्धा यांसारखी उघडपनाणे होणारी विक्री होऊ शकते का?
हे विकण्यास त्यांना कोणत्या विभागाने अधिकार प्रदान केले आहे? याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून आहे.
वरील वर्णन केलेल्या बाबीवर गांभीर्याने लक्ष देवून त्यांचा वर २ दिवसात आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आपल्या मार्फत कोणतेही कार्यवाही न झाल्यास पोलीस स्टेशन कन्हान समोर महिला विकास आघाडी तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे निवेदन च्या माध्यमातून सांगण्यात आले.
प्रामुख्याने उपस्तीथ
नगराध्यक्षा कन्हान-पिपरी नगर परिषद सौ.करूना आस्टनकर,
नगर सेवक अनिल ठाकरे, मनीषा चिखले, शुभांगी घोगले, कोमल लांजेवार,हर्षली भानारकर,वैशाली श्रीखंडे,वैशाली थोरात,सुषमा मस्के,पोर्णिमा दुबे, वैशाली खंडार,लीना हारोडे, जोशीला ऊके,मीरा वाडीभस्मे,अनिता इन्वाते, रत्नकला पारधी,सविता बल्लारे, शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटू राणे, भारत पगारे सुनीला पिल्ले,चिंटू वाकुलकर,अजय चव्हाण, संजय शेंद्रे , प्रवीण गोडे, हरिष तिडके, सैलेश दिवे व कन्हान शहर मधील महिला मोठ्या संखेत उपस्तिथ होते.
प्रतिनिधी :- भारत पगारे


0 टिप्पण्या