कांद्रीत ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात
तिरंगा रॅलीने कांद्री नगरी दुमदुमली; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर तिरंगामय
कन्हान : - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कांद्री नगरपंचायत हद्दीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. हातात तिरंगा घेऊन काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत देशभक्तीपर घोषणांनी कांद्री नगरी दुमदुमून गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष चेतन खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अभियानात भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर ग्रामीण (रामटेक)चे उपाध्यक्ष उमेश कुंभलकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली.
देशभक्तीपर गीतांच्या सुरावटी, ‘भारत माता की जय’च्या जयघोषात आणि हातात फडकणाऱ्या तिरंग्यांमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगला होता. रॅलीत भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग, मंडळ महामंत्री सचिन वासनिक, उपाध्यक्ष लाखेश्वर वासाडे, कार्यालय मंत्री राजेश पोटभरे, प्रसिद्धी प्रमुख विनोद कोहळे, कांद्री शहर भाजप अध्यक्ष शिवशंकर चकोले, भारतीय जनता कामगार आघाडीचे नागपूर ग्रामीण (रामटेक) पदाधिकारी राहुल वंजारी यांच्यासह नितेश कांबळे, रोशन किरपान, दिनेश राऊत, शुभम यादव, आकाश कापसे, सुभाष कापसे, विक्की पारधी, विक्की आखरे आणि प्रदीप आखरे उपस्थित होते.
अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवून देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कांद्रीतील ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या