Advertisement

वेकोलि चा कोळसा चोरून मारोती व्हँन वाहना मध्ये भरतांना सुरक्षा अधिकारी व पोलीसांनी पकडले

वेकोलि चा कोळसा चोरून मारोती व्हँन वाहना मध्ये भरतांना सुरक्षा अधिकारी व पोलीसांनी पकडले

कारवाई दरम्यान दोन आरोपी ला पकडुन त्यांच्या जवळुन कोळसा व मारोती व्हँन असा ५०,६४० रूपयाचा मुद्देमाल जप्त

कन्हान  – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रायनगर येथील विकास शाळे जवळील झाडी झुडपात २५ ते ३० बोरे अवैध कोळसा मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिकाऱ्यांनी व कन्हान पोलीसांनी संयुक्त कारवाई करित दोन आरोपी ला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन कोळसा व वाहना सह एकुण ५०,६४० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार (दि.९) फेब्रुवारी ला दुपारी १ वाजता वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे आणि कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम , हेड कॉन्स्टेबल मुदस्सर जमाल , वैभव बोरपल्ले , सम्राट वनपर्ती , हरिश सोनभद्रे , एनपीसी महेंद्र जळीतकर , प्रविण चव्हान आदि कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि विकास शाळेजवळ दोन ईसमांनी मारोती व्हॅन क्रमांक एम एच ३१ सी एन ७०४१ मध्ये चोरीचा  कोळसा भरला आहे . अश्या माहिती वरुन वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे आणि कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचली असता त्या ठिकाणी दोन इसम व मारोती व्हॅन क्र.एम एच ३१ सी एन ७०४१ दिसल्याने रविकांत कंडे आणि पोलीसांनी त्यांना पकडुन नाव , गाव विचारले असता १)देवनाथ प्रकाश वाडीभस्मे,२) सुरेश लिल्हारे दोन्ही राह.कांद्री असे सांगितले असता पोलीसांनी मारोती व्हॅन वाहनाची पाहणी केली असता वाहनात २५ ते ३० चोरी केलेल्या कोळस्याच्या बोऱ्या आढळुन आल्या. सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांनी सदर कोळसा वेकोलि खुली खदान वजन काट्यावर नेऊन वजन केले असता ३४४० किलो भरला. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपी ला ताब्यात घेऊन त्याच्या जवळुन २५ ते ३० बोरे दगडी कोळसा किंमत अंदाजे २०६४० रुपये व मारोती व्हॅन किंमत ३०,००० रु असा एकुण ५०,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे फिर्यादी रविकांत कंडे यांचे तक्रारीने आरोपी १) देवनाथ प्रकाश वाडीभस्मे,२) सुरेश लिल्हारे विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्ष क प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम सह पोलीस कर्मचारी करित आहे .

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या