विकसित व भ्रष्टाचार मुक्त ब्रह्मपुरीसाठी स्थानिक निवडणूक जिंकणे आवश्यक: प्रा.अतुल देशकर
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली विस्तारकांची बैठक
ब्रह्मपुरी :आगामी संघटन मजबुतीच्या दृष्टीने व स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी शहराच्या वतीने विस्तारकांची पहिली बैठक येथील दुर्गा मंगल कार्यालयात पार पडली. ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या संकल्पनेतून ब्रह्मपुरी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विस्तारक योजना राबविण्यात येत आहे. यात ब्रह्मपुरी शहराचे वेगवेगळे भाग तयार करण्यात आले असून विस्तारक घरोघरी संपर्क करणार आहेत.
न.प मध्ये सत्तापक्षाचे नेते ब्रह्मपुरी क्षेत्राचे लोकप्रतिनिधी, मंत्री असतांना सुद्धा मागील काळात ब्रह्मपुरीचा काहीच विकास झाला नाही. नगर परिषदेत सर्वत्र भोंगळ कारभार असून फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. विकसित व भ्रष्टाचार मुक्त ब्रह्मपुरीसाठी स्थानिक नगर परिषद निवडणूक जिंकणे आवश्यक असल्याचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सांगितले. तत्कालीन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 2015 साली कोट्यवधी रुपयांचे विकास कामे ब्रह्मपुरी ला दिले त्या नंतर ब्रह्मपुरीत प्रभावी विकास कामे झाले नाही असे ही देशकर या वेळी म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणात देवराव भोंगळे यांनी केंद्रातील मोदी सरकारचे व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या जनोपयोगी योजना घरोघरी पोहचविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी विधानसभेचे प्रमुख प्रा. कादर शेख यांनी विस्तराक योजनेच्या अंमलबजावणीची दिशा कार्यकर्त्यांना दिली. या प्रसंगी भाजपा शहर महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज भूपाल यांची विस्तारक योजनेच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला विधानसभा विस्तारक प्रा. शेख सर, जिल्हा संगठन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, ओबिसी मोर्चाचे प्रदेश कार्य. सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, महामंत्री मनोज वठे, शहर कोषाध्यक्ष अरविंद नंदुरकर, जिल्हा सचिव रश्मीताई पेशणे, साकेत भानारकर, भाजपा ओबीसी आघाडीचे शहर अध्यक्ष प्रा. अशोक सालोटकर, भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर, भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बालबुधे, संजय लांबे, अविनाश मस्के, रितेश दशमवार, अमित रोकडे, माजी नगरसेविका सौ. अनघा दंडवते, गोपाल कावळे, उत्तम उरकुडे, सुधाकर ठेंगरी, ॲड. अंडेलकर, लोकेश भर्रे, चंदू पाणसे, सुभाष सहारे, सौ. वर्षा चौधरी, नलिनी बगमारे, विनायक दुपारे, विक्रम कावळे, गणेश पिल्लारे, पाटणी, ललित उरकुडे यांचेसह शहरातून मोठ्या संख्येने उत्साही कार्यकर्ते व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.


0 टिप्पण्या