Advertisement

उदापूर गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश

उदापूर गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश

ब्रम्हपुरी – काँग्रेस पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या उदापूर गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ब्रह्मपुरी येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयामध्ये विधानसभा प्रभारी श्री नावेद मुक्तार खान, आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष दिलीप प्रधान यांच्या नेतृत्वात

चाळीस ते पन्नासच्या संख्येने पक्ष प्रवेश केला.

उदापूर हे गाव काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, मात्र येथे काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आम् आदमी पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरच काँगेस पक्षाची साथ सोडुन आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची धडाकेबाज कामगिरी बघून,त्यांच्या कार्यावर

विश्वास ठेवून,  चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, बेरोजगारी या सर्व आश्वासनांची पूर्तता पाहून, सर्वसामान्यांचा पक्षावर विश्वास बघून, स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभार असल्याने पक्ष प्रवेश करत असल्याचे यावेळी पक्ष प्रवेश करतांना कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी ग्राम समिती कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीत कृष्णा तुपट, शिवम पिलारे, जगदीश वाघमारे, मोहन नाकतोडे, अशोक कोरडे, चंदू ढोरे, सूरज माकडे. , प्रशांत नाकतोडे, सुधाकर भानारकर, सुनील पेंदाम, दिनेश मिसार, यासह अन्य कार्यकर्त्यांनी पक्षात स्पष्ट प्रवेश केला.

त्याबद्दल पक्षाने त्यांचे आभार व्यक्त केले आणि भास्कर पुंडलिक तुपट यांची तालुका ब्रम्हपुरी सहसंयोजक म्हणून घोषणा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या