भर पावसात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय वर विराट मोर्चा.
किमान 24 हजार रु.वेतन लागू करण्याची आयटक ची मागणी.
चंद्रपुर;- गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी 1500 रु मासिक तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व खाजगी शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान मासिक 24 हजार रु.वेतन लागू करा ,त्यांची चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती करा या सह अन्य मागण्यासाठी 18 जुलै 2022 रोजी भर धो धो पावसात आयटक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे , भाकप चे जिल्हा सचिव कॉ प्रा नामदेव कंनाके, संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ वनिता कुंठावार, कॉ राजू गैनवार, कॉ प्रदीप चिताडे, कॉ प्रकाश रेड्डी, कॉ श्रीधर वाढई , रवींद्र उमाटे, शंभाजी रायवाड, ललिता कोवे, छाया रागीट,
लीला आस्वले , छ्याया मोहितकर, संध्या वासेकर, कल्पना रायपूरे, रुंदा मानकर, कुंदा कोहपरे, जयघोष दिघोरे, सुषमा जमदार, निर्मला गुरनुले,
यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालय वर विराट मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मा पंतप्रधान व मा मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
आयटक च्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा दुपारी 1 वाजता आझाद बगीचा येथून भर धो धो पावसात काढण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी पावसाची व पुराची पर्वा न करता आपल्या ज्वलंत मागण्यांसाठी सरकार व प्रशासन विरोधात तीव्र घोषणाबाजी करत जिल्हा परिषद कार्यालय वर धडकले या नंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी संघटनेचे नेते कॉ विनोद झोडगे यांनी सरकार विरोधात हल्ला चढवत सांगितले की अत्यंत तुटपुंज्या मानधनावर या कर्मचाऱ्यांन कडून पोषण आहार तयार करण्या पासुन शाळा उघडणे,देखभाल करणे,स्वच्छता राखणे ,जेवणा नंतर विध्यार्थी यांचे ताट धुणे अनेक वेळेला सौचालय साफ करावे लागते इतके इतके करूनही त्यांना फक्त मासिक 1500 रु दिले जातात तेही चार चार महिने मिळत नाही तेव्हा प्रचंड वाढलेल्या महागाईत या कर्मचाऱ्यांनी जगावे कसे ?असा सवाल करीत अन्य राज्यात जसे पांडेंचेरी 14000 रु केरळ 10000 रु. तामिळनाडू 7700 रु मानधन दिल्या जातो तर महाराष्ट्र मध्ये मात्र 1500 रु देऊन महाराष्ट्र सरकारने या कर्मचाऱ्यांची थट्टा केली आहे.तर केंद्र सरकारने सुध्दा 2000 रु मासिक मानधन वाढविण्याचे जाहीर केले होते परंतु आत्ता पर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही असा आरोप करत विविध मागण्यां आज मोरच्या द्वारे केले, ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 24 हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे. 12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी
यांसह अन्य मागण्यांचा समावेश होता.
मोरच्यात जिल्ह्यातील हजारो शापोआ कर्मचारी मोठया संख्येने भर पावसात छत्र्या घेऊन सहभागी झाले होते.



0 टिप्पण्या