Advertisement

अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या ट्रकचा शोध घेऊन कारवाई करावी - प्रहार संघटना

अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या ट्रकचा शोध घेऊन कारवाई करावी – प्रहार संघटना

नागभीड-  कोर्धा गावाजवळ झालेल्या अपघातात जयघोष तुपट आणि स्वप्नील भागडकर या दोन निष्पाप व्यक्तीला आपल्या जीवाला मुकावे लागले असून आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही पोलीस प्रशासन त्या ट्रकचा शोध घेऊन कार्यवाही करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे . या अपघातात दोन जणांनी जागेतच आपले जीव गमावले असुन पोलीस प्रशासन मात्र अद्यापही बघ्याची भूमिका घेत आहे .

सदर घटना घडली तेव्हा ॲड.विजय कुरूटकर यांनी स्वतः  पोलीस ठाण्यात अपघातासंदर्भात फोन करून माहिती कळविली होती . परंतु पोलिसांनी अद्यापही आरोपी वाहनाचालकाचा शोध न घेतल्याने मृतकाच्या परीवाराला शासकीय स्तरावरुन मिळणाऱ्या आर्थिक निधीपासून वंचित राहून उपासमारीची पाळी आली आहे . त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा प्रहार संघटना आपल्या स्टाईलने आंदोलने करेल व त्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जवाबदार राहील असे प्रहारसेवकांनी म्हटले आहे .

प्रतिनिधी :- राहुल भोयर, ब्रम्हपुरी-चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या