Advertisement

ब्रम्हपुरी शहरात मान्सूनपुर्व स्वच्छतेचा अभाव..!

ब्रम्हपुरी शहरात मान्सूनपुर्व स्वच्छतेचा अभाव..!

लोकप्रतिनिधी व प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांचा विसर

ब्रम्हपुरी –

जून महिन्याचा शेवट सुरु असल्याने शहरातील नागरिकांना प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पुर्व संधेला काही माफक अपेक्षा असतात ज्यात नाली  गटार सफाई , रस्त्याची डागडुजी, रस्त्यालगत असलेल्या झाडाची कटाई, जमा असलेल्या कचऱ्याचे संकलन. मात्र पावसाची सुरवात होतं असतांना नगरपरिषद प्रशासनाकडून या नाली सफाईच्या कामावर असलेल्या ५० कामगारांना कमी करत मोजक्या ३० सफाई कामगारांच्या भरवश्यावर नियोजन शून्य भूमिकेने, ढसाळ कामगिरीने शहरात सर्वत्र जैसे थे  परिस्थिती असल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सुरु दिसून येत आहे.

मोठ्या थाटामाटात स्थानिक आमदार व जिल्हा पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत नागरिकांनी शहरात कांग्रेस आघाडीची सत्ता बहुमताने निवडून दिली व त्याअपेक्षे प्रमाणे शहरात विकासासाठी निधीसुद्धा मिळाला. मात्र शहराला सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधीचे कार्य राजकारणातील टक्केवारी व निकृष्ट पद्धतीनचे बांधकाम  अनुभवल्याचे नागरिकांच्या चर्चेतून सामोरं येत आहे. तर कित्तेक नगरसेवकाचे प्रभागात दर्शन दुर्लभ झाल्याचे दिसून येत असल्यामुळे प्रभागातील समस्यांबाबत उत्तर देण्याची गरजसुद्धा त्यांना राहिली नाही.

नागपूर वासी कंत्राटदाराला दिलेला शहरातील स्वच्छतेचा काम किती इमाने इतबारे होतं आहे याची शहनिशा करण्याची जिम्मेदारी न. प. प्रशासनाची आहे मात्र फक्त तीस कामगारांच्या उपस्थितीत संपूर्ण शहराची स्वच्छता म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था आजघडीला शहरातील स्वच्छतेची दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या आगमना पूर्वी नागरिकांच्या माफक गरजा पूर्ण करण्याची सुद्धा आर्थिक हित संबंधाच्या स्पर्धेत गुंतलेल्या लोकप्रतिनिधीना वेळ नसल्याने नागरिकांत सर्वत्र नाराजीचा सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या