ब्रम्हपुरी येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती साजरी
गाडगे बाबांच्या पुतळ्याची स्थापना
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी मध्ये राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांची १४६ वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्रीसंत गाडगेबाबा धोबी/वरठी समाज मंडळ, आणि राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी च्या वतीने, श्रीसंत गाडगेबाबा यांची १४६ वी जयंती ,आणि या जयंती च्या दिवशी, देलनवाडी लेआऊट मधील प्लॉटच्या जागेवर राष्ट्रसंत श्री गाडगे बाबांचा पुतळा स्थापन करण्यात आला, या साठी मंडळाचे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री रविभाऊ मेश्राम यांनी स्व. श्री पांडुरंग मेश्राम यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुतळ्याच्या ओट्याचे बांधकाम दान स्वरूपात केले आणि मूर्तीचे खर्च श्री वासुदेवरावजी कढीखाये यांनी केले, या अनावरण सोहळ्या नंतर वक्तृत्व स्पर्धा,आणि भजन कीर्तन करून महाप्रसादाचे भोजन दान करण्यात आले. यासाठी अध्यक्ष श्री रविभाऊ मेश्राम,श्री वासुदेवरावजी कढीखाये, सहसचिव श्री मंगेश मेश्राम, श्री प्रमोद मेश्राम, श्री लालाजी पेंदोरकर, कार्याध्यक्ष श्री महेश कावळे, श्री अवि मेश्राम, कौस्तुभ मेश्राम, श्री प्रकाश मेश्राम आणि सर्व कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी तन मन धनाने मदत केली.
प्रतिनिधि राहुल भोयर


0 टिप्पण्या