Advertisement

डॉ. अनमोल टेभूरणे! भारत सरकारच्या राज भाषा सेवा अवॉर्ड नि सन्मानित

डॉ. अनमोल टेभूरणे! भारत सरकारच्या राज भाषा सेवा अवॉर्ड नि सन्मानित

नागपूर:-

भारत सरकारच्या गृहमंत्रालय अंतर्गत येणाऱ्या राजभाषा विभागा मार्फत या वर्षीचा राष्ट्रीय स्तरावरचा राजभाषा सेवा पुरस्कार, नागपूर चे नॅशनल सँपल सर्वे सिव्हिल लाईन कार्यालयातील राजभाषा अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ अनमोल टेंबुरणे यांनी या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल राजभाषा सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर राजभाषा कार्यान्वित समितीमार्फत पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्य्या विभागीय कार्यालयातील सब रंग सभागृहात पावर् ग्रीड कॉर्पोरेशन चे संचालक श्री रवींदर कुमार यांचे हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ व पुष्प गुचछ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पावर ग्रीड चे वरिष्ठ प्रबंधक श्री ए.के. शर्मा उपस्थित होते. या वेळी प्रबंधक विनोद कुमार,आर नारायण उपस्थित होते. डॉ. अनमोल टेंभुर्ने, मानवीय अधिकार, सामाजिक, धार्मिक, शेक्षणिक शेत्रात भरीव काम करीत आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बदल त्यांचे मित्र परिवार सर्वश्री अशोक कोल्हटकर, योगेश चव्हाण, प्रदीप त्रिवेदी, दिलीप बाबरीया, शेकर जनबंधू,दिनेश डोंगरे,अजय डोंगरे,राजेश रायपुरे धीरज कडबे आदींनी अभिनंदन केले

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या